गोरख शर्मा - Mahainfo

Ads 720 x 90

ads
Responsive Ads Here

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 27 December 2019

गोरख शर्मा

गोरख शर्मा
गोरख शर्मा

आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गायक व अभिनेता यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कारण मुळात आपण चित्रपटाचे मूल्यमापन बहुतेक वेळा गायकी व अभिनय या पारिमाणानी करतो.

पण यामध्ये आपल्याला त्या चित्रपटाला संगीताने सजवणाऱ्या संगीतकाराला विसर पडतो. पण काही संगीतकार या चित्रपट सृष्टीला असे लाभले आहेत की चित्रपटाचे नाव घेताच त्यांचे संगीत आणि धून मनामध्ये चमकून जाते.

असेच एक अतिशय उत्कृष्ट आणि ज्यांच्या संगीताची जादू 1960 पासून आजपर्यंत लोकांच्या मनावर राज्य करत आहे असे अजरामर कलाकार श्री. गोरख शर्मा. बॉलीवूडचे एक अद्वितीय गिटारिस्ट आणि चित्रपटसृष्टीचे पाहिले बेस गिटारिस्ट..
ज्यांचा जन्म आजच्या दिवशी 1946 ला मुंबई येथे झाला. सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल शर्मा (लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यातले प्यारेलाल) यांचे ते लहान भाऊ.
त्यांनी 1000 पेक्षा जास्त गाण्यांमध्ये गिटार आणि विविध तंतुवाद्ये वाजवली. गिटार, मॅडोलीन, रुबाब, बेस गिटार, मांडोला इत्यादी वाद्ये वाजवणारा एकमेव कलाकार म्हणजे गोरख शर्मा.
       कर्ज मधील एक हसीना थी, चौदवी का चांद हो, आशिकी मधील सगळीच गाणी विशेषतः सांसो की जरूरत हे जैसे, इम्तिहान चित्रपटातील रुक जाना नही तू हारके, डर चित्रपटातील जादू तेरी नजर, बॉबी मधील गाणी विशेषतः मैं शायर तो नाही, एक दुजे के लिये मधील हम बने तुम बने एक दुजे के लिये, आणि अजून खूप आहेत. खूप जणांना ह्या धून माहिती आहेत पण त्यामागे कष्ट आणि मेहनत कोणाची  आहे हे माहीत नाही त्यासाठी हा लेखनप्रपंच.
गोरख शर्मा यांचे हे योगदान नेहमीच लक्षात राहील व उगवत्या संगीतकारांना प्रेरणा देत राहील.

अश्या महान कलाकाराला जयंतीनिमित्त अभिवादन

1 comment:

Post Top Ad

Your Ad Spot